"जळगाव फर्स्ट" हे नागरी विकासासंदर्भात विधायक, सकारात्मक आणि योग्य दिशेने कार्य करणारे लोकसंघटन आहे.

शहरातील मुलभूत सेवा-सुविधांच्या विकास विषयक सरकारी योजनांचा पाठपुरावा करणे, नियमानुसार अंमलबजावणी करणे आणि कालमर्यादेत गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करुन घेणे या मूलतः हेतूने जळगाव फर्स्ट हे लोकसंघटन आहे. शहर विकासाचा विचार करताना, व्यक्तिगत हितापेक्षा सामुहिक नागरी हिताचा विचार सर्व प्रथम करणे हा प्राथमिक विचार लोकांच्या मनांत रुजविण्यासाठी जळगाव फर्स्ट हे लोकसंघटन काम करीत आहे.

“Jalgaon first” is public movement which is working towards civil development for constructive and positive work in a proper direction.

The major aim of the movement is to follow the Government schemes related to basic amenities in Jalgaon city and to monitor the proper execution of the Government schemes as per rules and norms. Within stipulated time to get the quality work done is the prime aim of this public movement. While considering the development of Jalgaon, we have to emphasize mass interests than personal interests. To inculcate the seeds of above objective is the primary aim of Jalgaon First.

मिशन

जळगाव फर्स्ट या लोकसंघटनचे एकमेव मिशन निश्चित आहे. ते म्हणजे,

सरकारी योजनांचा निधी व स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्वनिधी नागरी सुविधांच्या निर्मिती, दुरुस्तीवर निर्धारित काळात खर्च केला जावा, या शिवाय नव्या नागरी सुविधांचे निर्माण करताना सुविधेचा लाभ जनसमुहाला मिळावा, काम किंवा कार्य गुणवात्तापूर्ण व शाश्वत स्वरुपात व्हावे.

शहराचे सौंदर्य आणि पर्यावरण संरक्षण व्हावे, नव्या कामातून रोजगार निर्मिती व्हावी आणि कोणत्याही प्रकारचा सामाजिक असंतोष निर्माण होवू नये.

शहरातील सामाजिक सलोखा टीकून राहावा.

MISSION :‐
Jalgaon first, this public movement has one fixed mission i.e. proper implementation of government schemes, utilization of funds of local bodies to develop proper infrastructure of basic amenities in the city in a stipulated period. Jalgaon first will ensure the quality work done & creating newer public amenities benefitting large number of masses. While enhancing beautification of city
protection of environment maintaining communal harmony are major objective of Jalgaon first.

उद्दिष्ट्ये

१) जळगाव शहर सर्व सामान्य लोकांच्या राहण्यालायक बनविणे.
२) शहरात नागरी व समुहसेवा रस्ते, गटारी, पथदीप, सफाई, दिवाबत्ती, स्वच्छतागृहे, पाणी पुरवठा दुरुस्ती व नव्याने निर्मितीचा पाठपुरावा करणे.
३) शहरातील व्यापारीपेठ, व्यावसायिक प्रतिष्ठाने यांच्या स्थैर्य  विस्तारासाठी पोषक वातावरण तयार करणे.
४) शहरातील स्थापित व पारंपरिक उद्योगांचे बळकटीकरण, परिसरात नव्या उद्योगांची उभारणी यासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती.
५) रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती सोबत कामगार एकता, शांतता व कार्यक्षमता निर्माण करणे.
६) नागरीकांच्या आरोग्य संरक्षणाची हमी घेणाऱ्या सरकारी यंत्रणांचे बळकटीकरण व विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून समुह लाभाचे उपक्रम घेणे.
७) प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विषयक मुलभूत गरजांची पूर्तता करणे. उच्च शिक्षणाची नवी दालने उघडणा-या संस्थांना सहकार्य करणे.
८) मुली, महिलांच्या शिक्षण, संरक्षण, आरोग्य, रोजगार याकडे जाणिवपूर्वक लक्ष देणे.
९) शहर अतिक्रमण मुक्त करताना रस्त्यावरील बाजाराचा घटक असलेल्यांचा रोजगार हिसकावला जाणार नाही, त्यांना पर्याय देवून त्यांच्या पूनर्वसनाचा पाठपुरावा करणे.
१०) शहरातील प्रत्येक नागरिकाच्या जान व मालाच्या सुरक्षेची हमी घेणे.

OBJECTIVES :‐
1. Making Jalgaon work living for common people.
2. To take follow up of public amenities including street lamp, Cleaning, Severage, toilets, sanitation, proper water supply in proper order.
3. To create congenial atmosphere for city markets, professional institutions helping them for stabilization.
4. Strengthening the established institutes & traditional industries also creating new industries & for it to create congenial environment.
5. Creating employment self employment maintaining their unity, efficiency in a peaceful atmosphere.
6. Strengthening the health care system taking NGOS in confidence.
7. Fulfilling fundamental need of primary and secondary education and co‐operating with the institutions aspiring to open newer dimensions of higher education.
8. Paying deliberate attention to WOMEN education, health, and empowerment.
9. To restore the encroachment on mains street of the city by co‐ordinating the street vendors and administration.
10. To assure the public about life and property.