जळगाव फर्स्ट

सकारात्मक कृतीची लोकचळवळ

जळगावकर मित्रहो नमस्कार.

Dr. Radhyesham Chaudhariसोशल मिडीयाच्या युगात जागतिक गप्पांच्या कट्ट्यावर जळगावच्या वर्तमान स्थितीत सुधारणा आणि भविष्य काळातील विस्तार,  विकासाची चर्चा, कृती आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी जळगाव फर्स्ट हे लोकचळवळीचे व्यासपिठ सुरु करीत आहे. हे व्यासपिठ पक्ष विरहीत आणि मुक्त विचारांचे आहे. सर्व प्रथम जळगाव शहराचाच विचार हेच या व्यासपिठाचे उद्दिष्ट आहे. शहरात राहणाऱ्या जळगावकरांसह येथून देशाच्या इतर प्रांतात किंवा परदेशात स्थायिक जळगावच्या मूळ नागरिकांनाही शहर विकासाविषयी आपले मत, विचार, कल्पना शेअर करण्यासाठी हे मंच  आहे.

पूर्वी जळगावची ओळख तेलबिया, डाळीचे आणि कापसाचे आगार म्हणून होती. डाळनिर्मिती करणारे डाळफड होते. तेल गाळणाऱ्या असंख्य गिरण्या होत्या. कापसापासून कापड तयार करणारी खान्देश मील होती. सुबत्ता होती. काळ बदलला. डाळफड जावून डाळ मील आल्या. तेलबियांसाठी महाफेड आले. कापसावर प्रक्रियेसाठी सुतगिरण्या उभ्या राहिल्या. शेतीपूरक जिल्हा दूध संघ आला. पुन्हा काळ नव्या वळणावर आला. जळगावची बाजारपेठ सुवर्णनगरी झाले. धान्याचा बाजार म्हणून दाणा बाजार उभा राहिला. संपन्नता आली.

औद्योगिक वसाहती दोन प्रकारे विस्तारल्या. एक सहकार वसाहत आली. दुसरी महामंडळाची वसाहत आली. २ हजारांवर उद्योग आहे. पाईप नगरी, चटई नगरी असाही शहराला चेहरा मिळाला. परदेशात एक्सपोर्ट करणारे अनेक उद्योग सातासमुद्रापार गेले. जैन उद्योग समुह, के. के. कैन्स , दाल परिवार अनेक देशांत पोहचले. त्यानंतरच्या काळात जळगावला हॉस्पिटल नगरी, शैक्षणिक नगरी अशीही ओळख मिळाली. नागरीसेवा देणारी कौलारू पालिका १७ मजली काँक्रीट इमारतीत गेली. पालिका ते मनपाच्या प्रवासात शहराचा घडलेला विकास पाहायला इतर ठिकाणची शिष्टमंडळे जळगावात येत असत. असे सारे "अॉल ईज वेल "असताना गेल्या तीन वर्षांपासून जळगाव शहर आपली एकएक ओळख हरविते आहे. सुबत्ता, संपन्नताही लयाला जाणे सुरु झाले.

डाळफड पाठोपाठ कापड गिरणी, सूतगिरण्या बंद झाल्या. तेल गिरण्या कशाबशा सुरू आहेत. औद्योगिक वसाहतीत सुविधांचे प्रश्न आले. मनपा की एमआयडीसी सुविधा देणार यात उद्योजक भरडले गेले. एकिकडे शैक्षणिक हबची प्रगाती होताना मनपा शाळा बंद पडताहेत. पाईप इंडस्ट्री अडचणीत आहे. सुवर्ण नगरी ओळख कायम आहे. हॉस्पिटल नगरी कायम असली तरी सेवेचा खर्च वादातित आहे. डॉक्टरांवर दहशतीचे सावट आहे. इतर क्राईम रेशो वाढला आहे.

विकासाचे प्रतिक ठरलेली १७ मजली संचित तोट्याचे प्रतिक बनली आहे. मनपावर ५०० कोटींचे कर्ज आहे. जळगाव बाजारपेठ सक्षम करणाऱ्या २,१७५ दुकानदारांवर व्यापारी गाळ्यांच्या नुतनिकरणाचा प्रश्न आहे. शहर अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. आर्थिक डबघाईमुळे गेल्या तीन वर्षांत जळगावमध्ये प्राथमिक व मूलभूत सुविधा देण्यासाठी मनपा असमर्थ ठरली आहे. यातून मनपातील पदाधिकाऱ्यांवर नाकर्तेपणाचा व प्रशासनावर उध्दटपणाचा शिक्का बसला आहे. नागरिक नियमित कर भरत असून त्या बदल्यात सोयी, सुविधा मिळणे जवळपास बंद आहे. मनपात सक्षम विरोधक व प्रभावी संख्याबळ नाही. हे चित्र जळगावकरांची दिवसेंदिवस निराशा करीत आहे. सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासन ही कोंडी फोडताना दिसत नाही. अशावेळी पक्ष, विचारधारा सोडून लोकचळवळ व लोकसहभागाचे जळगाव फर्स्ट हे व्यासपिठ सुरू करीत आहे.

येथे जळगावचा वर्तमान व भविष्यकालीन विकास यावर चर्चा, मत मांडणी आणि कृतीशील सहभाग आवश्यक आहे. सरकार, मनपा प्रसासन यांच्या भरवशावर बसून विकास होणार नाही तर आता नागरिकांनीच एकत्र सामुहिक प्रयत्न करून आपणच आपले प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा आहे.

जळगाव फर्स्ट हे केवळ प्रश्न, अडचण, समस्या मांडण्याची भिंत नाही तर याठिकाणी उपाय योजना सूचविणे, लोकसहभागाची जबाबदारी घेणे हाही हेतू आहे. या व्यासपिठावर मित्र म्हणून येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत. केवळ मित्र होवू नका तर सक्रिय व्हा ... सक्रिय राहा ...

जय जळगाव ... जय महाराष्ट्र ...!!!

http://sangarshwari.blogspot.in/

Jalgaon FIRST

MASS MOVEMENT OF CONSTRUCTIVE ACTION 

Greetings to my Jalgaonkars ! NAMASKAR.

We are floating Jalgaon first, as public dias with the view of improving the current pathetic, demoralizing situations and conditions, thinking about future expansions, discussion about development with enhancement of public participation and public actions on and off social media.

This dias is non political welcoming the liberal thoughts. The prime and foremost objective of this movement is development of Jalgaon city. This platform open to all citizens of Jalgaon may be scattered all around world. They can share their opinions, thoughts, ideas in the interest of our Jalgaon city.

Previously Jalgaon was known for richness in all dimensions from cotton ‐ banana market, educational hub to Gold City, including small industries like mats, Oils. The name of Jalgaon reached abroad through Jain Irrigation, Raymonds, KK Cans, Dal industries. Unfortunately the proud 17 storied corporation building which was a status symbol in Maharashtra has been sinking in a colossal debt of more than 500 crore Rupees. Local Representatives across the county used to come to study Jalgaon pattern of Municipal development. So All was well. But now since last 5 years Jalgaon has been loosing its glory, prosperity, developmental identity.
Renewal of 2175 municipal shop owners rent contract, poor sanitation facilities, bad streets, lack of service roads parallel to national highway, lack of most needed railway over bridges, dirty encroachments in the city exposing the limitations of corporation administration and tarnishing the imaged of local public representatives. So Jalgaon city development has been halted and in States‐Co . So we are in a stalemate situation.

In such a gloomy picture all the Young, Wise, Philanthropic, Professional, Sincere Citizens should come together irrespective of cast, religion, and political thoughts and launch a public movement through the dias of Jalgaon first is our prime motto.

JAY HIND! JAY MAHARASHTRA!! JAY JALGAON !!!